Thursday, February 7, 2008

मी एक सायुरी

कालच, गेल्या शतकातली एक प्रसिदध गेइशा, नित्ता सायुरी हीचे आत्मचरित्र वाचले. सुनन्दा अमरापुरकर यानी अनुवादीत केलेले.

गेइशा ह्या जपान मधिल. मनोरन्जन करणारया. गेइशा म्हणजे कलावती. ( आपल्या कडे कश्या लावणी सादर करणार्या असतात, मला वाटते, गेइशा हे त्यान्चेच जपानी रुप असावे. ) अर्थात, खुप फ़रक आहेत त्यान्चयात.

वाचल्यावर एक धक्का बसला. आपले आयुष्य किती साधे आणि सुरक्शित असते! तरी आपण सरखे दोष देत असतो. पण इथे तर ८/९ वर्षाच्या मुलीना आणुन त्याना जाणीव पुर्वक गेइशा बनण्याचे शिक्शण देतात. त्यान्चया शाळा सुद्धा वेग्ळ्या. ज्यात गायन, वादन, न्रुत्य ह्यन्चेच शिक्शण देतात..

मोठया ( १३/१४ वषाच्या ) झाल्यावर त्यानी एक मोठी बहिण मिळवायची. ( म्हणजे senior गेइशा.) अशी एखादी गेइशा स्वतः हुन एखाद्या लहान मुलीची जवाबदारी घेते. म्हणजे तिला शिकवायची, तिला चान्गले customers मिळतिल याची काळजी घ्यायची.

अर्थात, ह्या मोठ्या गेशेला junior गेइशे च्या उत्पन्नातला काही भाग मिळ्तो.

रोज टि हाउसेस ला भेट द्यायची., तिथे गायचे, नाचायचे आणि असेच जगत रहायचे.

ज्या घरात ही मुलगी रहात असेल, तिथे रहायचे पैसे सुध्द्धा तिला फ़ेडावे लागत. काही तुटल, फ़ुटल तर ते ही धरत. त्यात घरातली ’मदर’( मुख्य स्त्री ), एखादी senior गेइशा असेल तर तिची दादागिरी सहन करत रहायचे.

सतत, तो त्रासदायक किमोनो घालायचा, मेक-अप चे थर चेह्र्या वर असताना लोकान्चे मनोरन्जन करायचे...

सायुरी चे आत्मकथन खुप अस्वस्थ, अन्तर्मुख करणारे आहे. सुखात लोळणार्या आजच्या तरुणीनी अवश्य वाचावे असे.