सकाळी पामर चे एक post वाचले. मिहीर आणि नीता चे. नीता ची आई खोदून प्रश्न विचारते म्हणून मिहीर रागावतो आणी relationship तोडतो. खरे आहे. अपमानस्पद वाट्णारच. पण वषानुवषे हे असे प्रश्न मुलीला, तिच्या आई वडिलाना विचारले जात आहेत. पामर चे post ’जमाना बदल रहा हे’ असे दाखवणारे एक उदाहरण आहे. पण असा प्रसन्ग एखादाच.
माझा च अनुभव सान्गते.
९ वषापुर्वीच्या २ घटना.
माझा ’दाखवण्याचा’ पहीला कार्यक्रम. आई, काकू, मावशी सग्ल्यनी पढवून ठेवलेले. मुलाकडचे आल्यवर सग्ल्यना वाकून नमस्कार केला.( मला मुळीच करायचा नव्हता ). विचारलेल्या प्रश्नान्ची खाल मानेने उत्तरे दिली. ते लोक निघताना परत नमस्कार केला. नकार आला. का तर, मुलगी उध्धट वाटते. आज इतक्या वषानतर ही मला आठवत नाही की मी काय उध्धट पणे बोलले! असो. मझ्या आजोबाना heart prob होता. कार्यक्रम चालू असतान मुलाचे वडिल बोलले, आजोबाना heart prob आहे? ( आजोबा तेव्हा ७५ वषान्चे होते !) मग मुलीला हि होऊ शकेल. ( काय सम्बध आहे!)
दुसरी घटना : वरील घटना घड्ल्यावर १ वषानी. ह्या वेळी पत्रिका द्यायला माझी आई आणि लहान बहीण गेल्या होत्या. तेव्हा त्या great वडिलानी सरळ विचारले, मुलगी तुमच्या ह्या लहान मुली सरखी काळी तर नाही ना? (आम्ही दोघी सावळ्या आहोत.) काय वाटले असेल आई ला उत्तर देताना ! आणि बहिणीला ? तीने ते उद्गार कसे पचवले असतील?
मला एवढेच वाटते की लग्नाची गरज मुलाला हि आहे की! आणी सगळी मुले काही सौद्र्याचे पुतळे नसतात.
तुम्हाला काय वाटते?
Monday, January 28, 2008
Subscribe to:
Comments (Atom)